
कुडाळ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयडीयल इंग्लिश मिडीयम इको स्कूल नेरूर येथे 5 जून 2024 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सारस्वत बँक कुडाळचे शाखाधिकारी श्री कृष्णाजी ठाकूर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नेरूर समृद्धी प्रतिष्ठान या संस्थेच्या चेअरमन डॉ नंदिनी नेरुरकर - देशमुख, सचिव डॉ व्यंकटेश भंडारी, खजिनदार राजीव नेरुरकर, कार्यकारी विश्वस्त श्री नितीन नेरुरकर, डॉ किरण दाभोलकर,सारस्वत बँकचे कर्मचारी किरण रेडकर, शाळेचे मुख्याध्यापक सौरभ पाटकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी यांच्या शुभहस्ते बेल, आवळा, बेहडा, जांभूळ, ऐन, बकुळ, पारिजातक अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी डॉ नंदिनी देशमुख यांनी उपस्थित सर्वांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले.