
सावंतवाडी : समाजातील युवकांची एक मजबूत फळी तयार करून त्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी सावंतवाडी येथे केली. यासाठी शासनाकडून पाच लाख रुपयांचा निधी प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी दोन वर्षांत ओरोस हुमरमळा येथे असलेले संत रोहिदास समाज भवन पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
आमचे समाज बांधव केवळ आपल्या परिसरापुरते मर्यादित न राहता इतर समाजांच्या मदतीला धावून येतात, ही बाब कौतुकास्पद असल्याचे जाधव यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन पाचवीपासून त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरक्षण असले तरी विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात अव्वल असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चर्मोद्योगाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असला तरी, या व्यवसायाला चालना देण्यासाठी भरघोस निधी मिळतो. त्यामुळे पारंपरिक कामाऐवजी अत्याधुनिक पद्धतीने पादत्राणे बनवण्याचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, समाज बांधवांकडे जाणाऱ्या पायवाटा मोकळ्या करण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखा विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सावंतवाडी शाखा उपाध्यक्ष आणि जिल्हा मंडळाचे सहसचिव बाबुराव चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रजलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण होते तर प्रमुख पाहुणेपदी जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर एलआयसी मुख्य अभियंता रवी किशोर चव्हाण सावंतवाडी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव तसेच शाखेचे सल्लागार परशुराम चव्हाण जिल्हा सदस्य नरसू रेडकर जिल्हा सदस्य संजना चव्हाण माजी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर माजी जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण माजी जिल्हा खजिनदार विजय चव्हाण माजी तालुका सचिव गुंडू चव्हाण तालुका सचिव जगदीश चव्हाण खजिनदार सूर्यकांत सांगेलकर उपाध्यक्ष शरद जाधव कल्याण कदम नरेश कारिवडेकर राजेश फोंडेकर संजय बांबुळकर महादेव पवार प्रशांत निरवडेकर प्रवीण साळगावकर संभाजी कांबळे सुनील तुळसकर महिला सदस्य ऋतुजा सरंबळकर लक्ष्मण आरोसकर सुधाकर बांदेकर विजय ओठवणेकर एड परशुराम चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्घाटक बाबुराव चव्हाण म्हणाले गेली 32 वर्षे आपण समाजकार्यासाठी काम करत आहे यापुढेही समाजसेवेत काम करत राहणार असल्याचे सांगितले यावेळी रवीं किरण चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पालकांनी आपल्या मुलाकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन केले यावेळी लवू चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण यांनी भविष्यात समाज बांधवांची व्यवसायाला लागणारी पारंपारिक शस्त्रांची ओळख करून देणारा प्रदर्शन भरवणार असून गावागावात दौरा काढून तरुणांची संघटना मजबूत करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले
यावेळी तालुक्यातील सुमारे 75 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला पदोन्नती मिळवलेल्या मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर दाभोलकर एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापक प्रति कुडाळ येथे नियुक्ती झालेले प्रवीण साळगावकर यांच्यासह डॉक्टर्स इंजिनियर दहावी-बारावीचे गुणवंत विद्यार्थी तर गेली 22 वर्षे सैन्य दलात सेवा बजावणारे माजी सैनिक चंद्रकांत पवार यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. पारंपारिक व्यवसाय सुरू ठेवणार याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.पदोन्नती/ प्रमोशन झालेल्या मध्ये रवीकीशोर चव्हाण मंगेश जाधव जगदीश चव्हाण लक्ष्मण आरोस्कर प्रवीण साळगांवकर सतीश सदानंद सांगेलकर, रामा आरोस्कर सेवानिवृत्ती मध्ये लवु चव्हाण राजन कारीवडेकर प्रकाश सांगेलकर अनंत निरवडेकर आनंद तुळसकर सुरेश बांदेकर यांचा तर विशेष सत्कार विजय नामदेव चव्हाण, विनायक चव्हाण राजेश फोंडेकर संजय बांबुळकर गुंडू चव्हाण अॅड श्री परशुराम चव्हाण दीपक ईन्सूलकर महेंद्र चव्हाण आणि गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. स्वरा बांदेकर . अथर्व बांदेकर. सखाराम (शिवम) चव्हाण . हर्षल बांदेकर . हर्षद चव्हाण सौ. शामल चव्हाण . राहुल चव्हाण. सुयश सांगेलकर . अनंत सांगेलकर,. ऐश्वर्या चव्हाण. आयुष बांदेकर इयत्ता तिसरी गुरुकुल परीक्षा प्रथम क्रमांक कु. कुशाल पवार याने पटकावल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी युवराज लखमराजे भोसले यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिला











