
देवगड : सामाजिक ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या संविधानिक विचार मंच देवगडच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनाची बैठक शिक्षक भवन येथे संपन्न झाली.
यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तहसीलदार कार्यलयानजिक च्या परिसरात 14 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. यासाठी नियोजन आणि पूर्वतयारी करिता सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपप्राचार्य प्रा. शिरसाट, प्रा.डाॅ. वानखडे, बी.एड्. काॅलेजचे प्राचार्य भालचंद्र मुंबरकर, मुख्याध्यापक सुनील घस्ती, संविधानिक विचार मंचाचे अध्यक्ष के. एस्. कदम, उपाध्यक्ष एम्.के.जामसंडेकर, महिला संघटक गौतमी कदम, कट्टा सरपंच श्वेता कोयंडे, राजेंद्र कांबळे, प्रा.डाॅ. नितीन वळंजू, संजय कांबळे, संजय कदम आदी उपस्थित होते. सरचिटणीस इंजिनिअर दिलीप कदम यांनी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करुन, कार्यक्रमाची संकल्पना व रुपरेषा सांगून लवकरच शहरातील इतर घटकांशी संवाद साधून कार्यक्रम पुर्णत्वास नेण्याचे आवाहन केले.