नियोजन हे महाराजांचे प्रखर शस्त्र : प्रा. रमाकांत गावडे

मॉडर्न कॉलनीत शिवजयंती उत्साहात
Edited by:
Published on: February 22, 2024 14:57 PM
views 74  views

सावंतवाडी : येथील न्यू सबनीसवाडा मॉडर्न कॉलनी येथे यावर्षी प्रथमच शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साह पूर्ण संपन्न झाला सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्पागुच्छ देऊन कॉलनी चे अध्यक्ष प्राध्यापक रमाकांत गावडे यांनी स्वागत केले आणि प्रस्ताविका मध्ये शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. महाराजांकडे नियोजन हे प्रखर शस्त्र होते त्याचा उपयोग करून महाराजांनी राज्य चालवले असे उदगार त्यांनी काढले. यानंतर माजी नगरसेवक श्री बाबू कुडतरकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाची सुरुवात मा. अशोक दळवी आणि बाबू कुडतरकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री पेडणेकर, नगरसेविका श्रीम. भारती मोरे आणि अनेक शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री बाबू कुडतरकर यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत सांगेलकर यांनी केले तर आभार श्री गजानन सावंत सर यांनी मांडले.