
दोडामार्ग : गणेश उत्सव सणा निमित्त दोडामार्ग बाजारपेठेत नियोजन बद्ध स्वरूपात सर्व बाजरपेठ ठेवण्या संदर्भात व्यापारी, पोलीस, एसटी वाहतूक, रिक्षा दुचाकी यांची नियोजन बैठक कसई - दोडामार्ग नगरपंचायत येथे चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी नगरपंचायतच्या नियमांचे पालन करून सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन ही यावेळी नगरपंचायतच्या माध्यमातून करण्यात आले.
कसई - दोडामार्ग नगरपंचायत हॉल येथे आयोजित नियोजन बैठकीत दोडामार्ग पोलीस, बांधकाम विभाग, व्यापारी, रिक्षा चालक, दुचाकी, फेरीवाले एसटी विभाग या सर्वांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण म्हणाले की रिक्षा चालक, दुचाकी चालक, टॉम्पो चालक, फेरीवाले, एसटी बस यांनी नगरपंचायतने दिलेल्या जागेतच आपली वाहने उभी करायची आहे. रिक्षा चालक यांनी मुख्य पिंपळेश्वर चौक येथे ५ रिक्षा फक्त उभ्या कराव्यात, तसेच टॉम्पो चालक यांनी भेडशी रस्त्यावर रोजच्या नियोजित जागेत फक्त ५ वाहने उभी करावीत बाकीची वाहने रेणुका हॉटेल च्या खाली वाहने लावावित, तसेच फिरते फेरीवाले आहेत यांना नगरपंचायतने आखून दिलेल्या चौकटात बसणे बंधनकारक आहे. तसेच पोलिसांनी मुख्य बाजार पेठेत एकही वाहन उभे राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांनी गणपतीच्या आधी ४ दिवस सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक राजू प्रसादि, नितीन मणेरिकर, सोनल म्हावळणकर, पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, वाहतूक पोलीस धुमाळे, संजय शिरोडकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, श्याम चांदेलकर, रिक्षा चालक गुरु हळदणकर, राजन देसाई, दुचाकी चालक हनुमंत शिरोडकर, सुशांत राऊत, दादा रेडकर, अबि, टॉम्पो चालक बाबू म्हावळणकर, व्यापारी मोरजकर, नगरपंचायत कर्मचारी, सर्व रिक्षा, टॉम्पो पायलट व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
वाहन पार्किंग ठिकाण
गणेश उत्सवच्या आधी ४ दिवस बाजार पेठ पूर्णपणे भरणार आहे. त्यामुळे मुख्य बाजार पेठेत आलेल्या ग्राहकांना तसेच इतरांना वाहन पार्किंग मुळे त्रास होऊ नये किंवा बाजरपेठेवर परिणाम होऊ नये यासाठी नगरपंचायतने वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे. दोडामार्ग गोवा रस्त्यावर नवीन पंचायत समिती व राजू प्रसादी यांच्या जागेत, तसेच आयी रस्त्यावर मराठी शाळा नं १ च्या ग्राऊंडवर, दोडामार्ग बांदा रस्त्यावर हडिकर बिल्डिंगच्या नजिक तसेच भेडशी रस्त्यावर गणपती मंदिर परिसरात वाहन पार्किंग ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे बाजार पेठेत येणाऱ्या सर्व ग्राहकांनी आपली वाहने दिलेल्या पार्किंग जागेतच पार्क करावी अन्यथा पोलिसांकडून दांडात्मक कारवाई केली जाईल.
एसटी बस नियोजन
दरम्यान दोडामार्ग बाजारपेठ अगदी अरुंद असल्याने मुख्य बाजारपेठेत एसटी बस उभी राहिल्यास पूर्णपणे ट्राफिक होत यासाठी गावातून दोडामार्ग बाजारपेठेत येणाऱ्या एसटी बस बाजरपवठेत उभ्या नकरता त्या थेट एसटी डेपोतच उभ्या कराव्यात रविवार पासून सावंतवाडी, आयी, तिलारी परिसर, पिलूळे परिसर आदी भागातून दोडामार्ग बाजार ठिकाणी येणाऱ्या एसटी बस बाजरपेठेत थांबणार नाही तर त्या एसटी डेपोत जाऊन थांबणार आहे यांची सर्व ग्राहकांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी.
अवजड वाहतूक बंद
बांदा पत्रादेवी मुख्य हायवे वरून अवजड वाहतुक थांबवली जात असल्याने काही अवजड वाहने दोडामार्ग मार्गे गोव्यात जातात. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होते ही सर्व वाहतूक सकाळी ०८ ते रात्री ०८ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याचे पोलिसांनी पूर्णपणे नियोजन करायचे आहे.
आरोग्य विभाग 4 दिवस स्टॉल लावणार
दरम्यान बाजरपेठेत ग्राहक व्यापरी वाहने यांनी मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत कोणतीही घटना घडू नये यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालंय यांचा एक स्टॉल बाजरपेठेत असणे गरजेच आहे यासाठी त्यांचा एक स्टोल लावण्यात येणार आहे.