LIVE UPDATES

कणकवली शहरात कचऱ्याचे ढीग

कचरा उचलण्याच्या कामाकरिता पुण्यातील ठेकेदाराची नियुक्ती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 10, 2025 20:24 PM
views 124  views

कणकवली : कणकवली बाजारपेठेमध्ये कचऱ्याची समस्या ही गेले काही महिने सातत्याने जैसे थे स्थितीत असून कणकवली बाजारपेठेमध्ये महापुरुष कॉम्प्लेक्स समोरील कचरा उचलण्यास वारंवार टाळाटाळ केली जात आहे. तर फ्लाय ओव्हर  ब्रिज खाली देखील कचरा सातत्याने साचलेल्या स्थितीत असल्याने याबाबत नगरपंचायत स्वच्छता विभाग सुशेगात असल्याची स्थिती आहे.

गेल्या सहा महिन्यापूर्वी कणकवली नगरपंचायत च्या कचरा उचलण्याच्या ठेकेदारांमध्ये बदल झाला असून पुणे येथील ठेकेदार या कामासाठी नियुक्त करण्यात आला आहे. मात्र या ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासनाचे तूर्तास नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. तर स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत यांची बदली झाली असून त्यानंतर कणकवली शहरातील स्वच्छतेचा सर्वच सेटअप बदलल्याचे चित्र दिसत आहे. शहरामध्ये डीपी रोड, फ्लाय ओव्हर ब्रिज खालील भागात तसेच बाजारपेठेमध्ये असलेला कचरा वेळच्यावेळी उचलला जात नाही. त्यामुळे शहरात अस्वच्छतेचे वातावरण पसरले असून कणकवली नगरपंचायतचे प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.