पिकुळेत होणार 'रायगडाला जेव्हा जाग येते' ऐतिहासिक नाट्यप्रयोग

Edited by: संदीप देसाई
Published on: February 23, 2024 10:41 AM
views 170  views

दोडामार्ग : पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयातील पटांगणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताहानिमित्त रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वा. 'रायगडाला जेव्हा जाग येते' हा महान ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पिकुळे येथील‌ पत्रकार तेजस देसाई, पत्रकार रत्नदीप गवस यांनी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. दिग्दर्शक गणेश ठाकूर व प्रा. वसंत कानेटकर लिखित या नाटकात ॲड. सोनु गवस, संदेश देसाई, कृष्णा देसाई, अजिंक्य देसाई, निधी नाईक, सचिन तेंडुलकर, श्रद्धा गवंडी, लक्ष्मी महात्मे हे कलाकार आहेत. नाट्यरसिकांनी या नाट्यप्रयोगास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.