रोटरीतर्फे सावंतवाडीत माफक दरात फिजिओथेरपी !

Edited by: विनायक गावस
Published on: September 11, 2023 20:16 PM
views 138  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोटरी क्लब संचलित रोटरी ट्रस्ट तर्फे सावंतवाडी शहरात माफक दरामध्ये फिजिओथेरपी सुविधा मंगळवार पासून सायंकाळी ४ ते ८ या कालावधीत सुरू होत आहे. या फिजिओथेरपी सेंटरमध्ये (साधले मेस समोर, रोटरी ट्रस्ट इमारत) ॲन्जेला रॉड्रीक्स या अनुभवी फिजिओथेरोफिस्ट सावंतवाडी शहारामध्ये सेवा देणार आहेत अशी माहिती रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे प्रेसिडेंट सुहास सातोसकर यांनी दिली.


रोटरी ट्रस्ट तर्फे शहरात माफक दरामध्ये सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच व्हीलचेअर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देखील या क्लबच्या माध्यमातून गरजूंना अगदी माफक दरात दिली जात आहे. नागरीकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन सुहास सातोसकर यांनी केल आहे. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे प्रेसिडेंट रो.सुहास सातोसकर, सेक्रेटरी रो.प्रविण परब,रो. डॉ. विनया बाड, रो. सु़धीर नाईक, रो. विजय कामत आदी उपस्थित होते.