प्रा.कविता तळेकर यांना मुंबई विद्यापिठाची PHD

Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2025 12:51 PM
views 215  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज  महाविद्यालय सावंतवाडी  (हिंदी विभागाच्या) प्रा. सौ.कविता तळेकर यांनी हिंदी विषयात मुंबई विद्यापीठाची पी.एचडी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी 'डॉ. नासिरा शर्मा संवेदना एवं शिल्प' या विषयावर संशोधन केले. 

त्यांना प्रा. डॉ अनिल कुमार सिंग (प्राचार्य, सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर व प्रभारी अधिष्ठाता मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता मुंबई विद्यापीठ मुंबई ) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हिंदी विभाग प्रमुख डॉ. डी. जी. बोर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांचे मार्गदर्शन लाभले. 

तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब  शुभदादेवी  खेमसावंत भोंसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत, प्राचार्य  डाॅ.डी.एल. भारमल, प्रा. एम. ए. ठाकुर ,हिंदी विभाग प्रमुख डॉ. डी.जी. बोर्डे उपस्थित होते.