यशवंतराव भोसले कॉलेजमध्ये साजरा होणार 'फार्मासिस्ट दिन'

Edited by: विनायक गांवस
Published on: September 24, 2025 17:20 PM
views 70  views

सावंतवाडी: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला जाणार आहे. संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या या दिनाची उद्यासाठी थीम "थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट" अशी आहे.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, शशिकांत यादव उपस्थित राहणार आहेत. तसेच भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम हे देखील उपस्थित असतील. यात स्थानिक फार्मासिस्ट व्यक्तींचा सत्कार, फार्मासिस्ट ऑफ द ईयर पुरस्कार वितरण, स्मरणिका अनावरण तसेच फार्मा लोगो, फार्मा घोषवाक्य, फार्मा पत्रके आणि फार्मा रांगोळी इत्यादी स्पर्धा असे राहिल. या स्पर्धा सर्व फार्मसी विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील आणि विजेत्यांना मुख्य कार्यक्रमात गौरविले जाईल. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा.अंकिता नेवगी व प्रा.डॉ.प्रशांत  माळी मेहनत घेत आहेत.