महेंद्र माईनकर यांना पॅरिस येथे पी.एच. डी साठी शिष्यवृत्ती

Edited by:
Published on: September 27, 2024 13:18 PM
views 523  views

सिंधुदुर्गनगरी : तहसिलदार कार्यालय कणकवली येथील तलाठी लोरे या पदावर कार्यरत मंजिरी दत्तात्रय माईणकर,रा. साकेडी यांचा मुलगा महेंद्र माईणकर यांला कॉलेज डे फ्रान्स पॅरीस येथे  पी.एच.डी साठी स्कॉलराशिप मिळाली असून तो पुढील शिक्षणासाठी पॅरीस येथे जात आहे. महेंद्र दत्तात्रय माईणकर यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर हायस्कूल कणकवली  इ.1 ली ते 5 वी, माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय सांगेली इ.6वी ते 10 वी, आयडीयल इंग्लिश स्कूल कणकवली येथे 11 वी ते 12वी, उच्चमाध्यमिक शिक्षण एसपी कॉलेज पूणे येथे झाले.  IIT JAM EXAM पुणे येथे दिल. MSC चे शिक्षण, आय.आय.टी मद्रास (Msc chamistry) येथे झाले. Phd Subjet, Sodium iron Batteries असून phd चे ठिकाण कॉलेज डे फ्रान्स पॅरीस या कॉलेजमध्ये 3 वर्षे शिक्षण होणार असून त्यांची स्कॉलरशिप महेंद्र यास मिळाली आहे.