सावंतवाडीत पेट्रोल पंपावर लागल्या होत्या वाहनांच्या रांगा !

Edited by: ब्युरो
Published on: January 02, 2024 08:35 AM
views 1019  views

सावंतवाडी : सावंतवाडीत पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर मंगळवारी पेट्रोल डिझेल उपलब्ध होत नव्हते. माजगाव येथील पेट्रोल पंपावरही पेट्रोल उपलब्ध नव्हते. पेट्रोल भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लांबच्या लांब रांगा तासनतास लागून राहिल्या होत्या. हे पेट्रोल का उपलब्ध नाही ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या.



पेट्रोल दर कमी होणार असल्याने पेट्रोल पंप मालकांनी साठा मागवला नाही. त्यामुळे ही कृत्रिम टंचाई जाणवत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टॅकर चालकांबाबतीत घेण्यात आलेले निर्णय, त्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला आहे. तर ४ जानेवारीनंतर पेट्रोल सुरळीतपणे मिळणार असल्याच वृत्त होत. दरम्यान, या संपावर सरकारकडून तोडगा काढण्यात आला असून आज सायंकाळ पासून पेट्रोल पंपावर सेवा पुर्ववत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उलट सुलट चर्चाआणि पेट्रोलच होणार वितरण या भितीने आज रात्री पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांनी मोठी गर्दी केली होती. तर एका पेट्रोल पंप मालकांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलचे दर कमी होणार असल्यामुळे काही पेट्रोल पंप चालकानी पेट्रोल साठा मागवला नाही. ह्यामुळे हा साठा संपवून कृत्रिम टंचाई जाणवत असल्याचे स्पष्ट केले. याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप या पेट्रोल चालकाने केला आहे. दरम्यान यामुळे सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची गैरसोय झाली होती.