
सावंतवाडी : घरगुती भांडणातून स्वतःच्या चार वर्षाच्या कोवळ्या मुलावर पेट्रोल ओतण्याचा धक्कादायक प्रकार काल रात्रीच्या सुमारास सावंतवाडीत घडला. पेट्रोल ओतणाऱ्या निर्दयी वडीलांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गर्दी होती.
सावंतवाडीतील त्या चार वर्षाच्या मुलावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलाच्या नाका तोंडात पेट्रोल गेल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सावंत यांनी दिली. हुसेन गडियाली याने आपल्या अन्य दोन मुलांवरही पेट्रोल ओतले होते. मात्र, त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलिसांनी हुसेन गडियाली याला ताब्यात घेतले. दरम्यान, हा प्रकार घरगुती वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी वर्तवली आहे.
जन्म देणारा बाप ४ वर्षांच्या मुलाच्या जीवावर उठल्याने शहरात संताप व्यक्त केला गेला. त्या चिमुकल्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.