अद्वैत फाउंडेशनच्यावतीने व्यक्तिमत्व विकास शिबिर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 29, 2025 20:10 PM
views 60  views

कणकवली : अद्वैत फाऊंडेशनच्या कणकवलीच्यावतीने राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर गोपुरी  आश्रम वागदे  येथे ९ मे ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. साने गुरुजींच्या समतेच्या आणि मानवतेच्या शिकवणीचे संस्कार या शिबिरात केले जातात.

कवायत, लेझिम, झांज, पथनाट्य, एरोबिक्स , कॅलेथानिक्स, ग्रेट भेट आदी उपक्रमासह धम्माल गप्पागोष्टींच्या माध्यमातून हसत खेळत शिबिरार्थींच्या मनात समता मानवता आणि बंधुतेचे विचार रुजवले जातात. शिबिराचे  हे आठवे वर्ष असून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ असणार आहेत. अधिक माहितीसाठी सरिता पवार मोबा.९४०३२९६६९४ ,राजन चव्हाण मोबा.७०३८८३४३५६ यांच्याशी संपर्क साधावा.