कणकवलीत शनिवार, ७ रोजी व्यक्तिमत्व शिबिर

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 05, 2025 20:31 PM
views 173  views

कणकवली : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने शनिवार 7 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत नगरवाचनालयाच्या सभागृहात जिल्हस्तरीय व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले आहे. 

या शिबिरात केद्रीय प्रशिक्षक अॅड. डाॅ. एस. एस. वानखडे, सचिव बी. एच. गायकवाड ही तज्ञ्ज मंडळी उपस्थित राहून कार्यकर्ते व पदाधिकारी यांना समाज व संघटनेमध्ये काम करताना आपल्या व्यक्तिमत्व विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले आहे.