
मंडणगड : बांग्लादेशातील हिंदु समाजा होणाऱ्या अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी व तेथील अत्याचारी सरकराचा निषेध नोंदविण्याकरिता मंडणगड येथे विश्व हिंदु परिषदेच्या तालुका शाखेचेवतीने सकल हिंदु समाजाच्या सहभागाने बांग्लादेश हिंदु न्याय यात्रेचे 10 डीसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मंडणगड येथे आयोजित केलेल्या बांग्लादेश हिंदु न्याय यात्रा व जनआक्रोश मोर्चास तालुक्यातील सकल हिंदु समाजाने हजारोच्या संख्येने उपस्थिती नोंदवून मंडणगड शहर ते तहसील कार्यालय भिंगळोली असा धडक मोर्चा काढला.
सकाळी 10.00 वाजता शहरातील स्टेट बँक ऑफ इडियाच्या परिसरात यात्रेस सुरुवात झाली. हजारोच्या संख्येने हिंदू बांधव भगिनींनी या मोर्चामध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. सर्वपक्षीय नेते पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चा मधील बांगलादेश निषेधाच्या, हिंदू एकतेच्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी शहर परिसर दणाणून निघाला. हिंदुच्या प्रश्नाकरिता बदलेल्या हिंदु समाज मनाचे या निमीत्ताने विराट दर्शन तालुक्यास या निमीत्ताने झाले. यावेळी तहसिल कार्यालय भिंगळोली येथील मैदानान आयोजित सभेत बांगलादेश मध्ये राहत असलेल्या हिंदुंवर असामाजिक तत्त्वाच्या माध्यमातून अत्याचार केले जात आहेत. याचा आक्रोश संपूर्ण जगात व्यक्त होत आहे. आज तमाम हिंदू बांधव व भगिनींनी एकत्र येऊन या विषयावरती चर्चा करण्याची, जागरूक होण्याची गरज असल्याचे मत प्रमुख वक्त्यांनी व्यक्त करत जनतेला आपल्याला आपल्या धर्माची रक्षा करण्याकरिता सतर्क राहण्याचे आवाहन केले.
या निमीत्ताने शहर व्यापारी संघटनेच्यावतीने मंगळवारी सकाळी दोन तासांचे बाजारपेठ बंदची हाकही देण्यात आली होती. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे श्री. सावंत, हेमंत भागवत, प्रमोद काटकर, सुनील मेहता, राजू चव्हाण, सचिन शेठ, भाजपचे तालुकाध्यक्ष आप्पा मोरे, माजी सभापती आदेश केणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक दिनेश लेंडे, उद्योजक दीपक घोसाळकर, सचिन थोरे, अस्मिता सोमण, वैशाली रेगे यांसह हजारोच्या संख्येने हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होत्या.