कायमस्वरूपी किटक शास्त्रज्ञ उपलब्ध

शेतकऱ्यांनी मानले आ. नितेश राणेंचे आभार
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 10, 2024 13:53 PM
views 105  views

देवगड : आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांनी चालू हंगामातील आंबा पिकव्यवस्थापन करताना निर्माण झालेल्या समस्या निवेदनाद्वारे आमदार नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. त्या निवेदनानुसार आमदार नितेश राणे यांनी संघाचे शिष्टमंडळाला प्रत्यक्ष चर्चा करणेसाठी पाचरण केले व थ्रीप्स मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन झालेले अतोनात नुकसान, अवकाळी पाऊस, महागडी कीटक नाशके यावर सविस्तर चर्चा केली. त्यावर गांभीर्याने विचार करून तात्काळ दुसऱ्या दिवशी कोकण कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ,जिल्हा कृषि अधिक्षक,तालुका कृषि अधिकारी , वेंगुर्ले व रामेश्वर प्रादेशिक फळसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व शेतकरी संघ यांच्यात प्रदिर्घ चर्चा घडवून आणली व ज्या बागांमध्ये किड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे अशा बागामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तयार करून अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच संबंधित क्षेत्रात कायमस्वरूपी किटक शास्त्रज्ञ उपलब्ध करून द्यायची तात्काळ सोय करून दिली आहे.

त्याचप्रमाणे नजीकच्या काळात कँनिंग हमीभावाबाबतचा तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघाच्या माध्यमातून प्रश्न त्वरित निकाली काढण्याची हमी दिली आहे. यावर्षीपासून नांदगाव येथे खुला बाजार शेतकरी संघाने पुढाकार घेऊन भरवावा त्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव असेन असे आश्वासनही मा. आमदार .नितेश राणे यांनी शेतकरी संघाला दिले आहे.

त्याचप्रमाणे संघाने गेले ३ ते ४ वर्षे वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व फळ पिक विमा नुकसानी बाबतचे निकष याबाबत संघाने पूर्वी दिलेल्या निवेदनानुसार हिवाळी व उन्हाळी अधिवेशनात मा. राणे यांनी आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. व सदरचे निकषा मध्ये बदल करण्याचे सूचित केले आहे. आमदार नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्याकडे प्रामुख्याने लक्ष घातल्याबाबत शेतकरी संघाने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.