महामार्गाच्या प्रलंबित कामांना लोकप्रतिनिधी जबाबदार : नागेश मोरये

Edited by:
Published on: November 23, 2023 15:50 PM
views 87  views

कणकवली  : जिल्ह्यातील महामार्गाच्या प्रलंबित कामांना जिल्ह्यातील मंत्री,आमदार, खासदार जबाबदार असून अनेकवेळा महामार्गावरील समस्या सोडविताना याच मंडळीकडून आश्वासने देऊन अनेक उपोषण, आंदोलन स्थगित करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य आसो वा प्रकल्पग्रस्तांच्या आजही मागण्या प्रलंबित आहेत. याचमुळे प्रशासन,महामार्ग हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने मनमानी कारभार केला आणि आज अनेक प्रश्न नांदगावसह जिल्ह्यात प्रलंबित आहेत असे माजी जि.पं.सभापती तथा महामार्ग आंदोलन कर्ते नागेश मोरये यानी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वीच महामार्ग संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती.मात्र किही मोजक्या लोकांची ही समिती कधी पुढे येताना दिसली नाही की, आजही अनेक प्रश्न असताना कधी पुढाकार घेतला नाही यामुळेच जिल्हातील मंत्री, खासदार, आमदार यानी आश्वासन दिले की, आंदोलन,उपोषण स्थगित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आज पर्यत सुरू आहे. तु मारल्या सारख कर,आणि मी रडल्या सारखा करतो अशी खेळी वरील सर्व व अधिकाऱ्यांची असल्यानेच आज खारेपाटण ते कलमठ असो वा कलमठ ते झाराप या ठिकाणी असणा-या प्रलंबित कामामुळे झाली आहे.

आज नांदगाव तिठ्ठा येथे चुकीच्या पध्दतीने कामे झाल्यानेच ओटव फाटा, नांदगाव तिठ्ठा सर्व्हीस रोडचा प्रश्न प्रलंबित होता मात्र आजही अनेक कामे प्रलंबित असून अनेकांचे मोबदले अडकले आहे. त्या कासार्डे,तळेरे,खारेपाटण येथील अनेक कामे प्रलंबित आहेत. तरी कधीही महामार्गा बाबत लोकप्रतिनिधी बोलताना दिसले नाही. तर अनेकवेळा याच सर्वानी धावते दौरे केले मात्र ज्याच्या समस्यां आहेत त्याना कधीच न भेटता जाऊन फक्त दिखाऊपणा केला. 

त्याचबरोबर नांदगाव तिठ्ठा ये ओटव फाटा, कासार्डे तिठ्ठा ते जांभूळवाडी, ब्राह्मणवाडी पर्यंत रहदारीच्या सर्वच ठिकाणी सर्व्हीस रोड पूर्ण होणे गरजेचे आहे अन्यथा अपघात होण्याची दाट शक्यता असून सरळ मार्ग वाकडा तिकडा कसा जातो याबाबत ड्रोनच्या साहाय्याने फेर मोजणी करण्यात यावी. अनेक ठाकाणी अनावश्यक भूसंपादन केले प्रत्यक्षात काही काम केले नाही. अनेकांच्या बीनशेती प्लेटमध्ये बांधकाम झाले मात्र मोबदला नाही. १९७४ चे परिपत्रक दाखवून शेतक-यांना अंधारात ठेवून मनमानी कारभार झाला आहे.तसेच सर्व्हीस रोड आठ मिटर नाहीत असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अशा अनेक विषयांवर सांगत चौपदरीकरण कामाचे वाभाडे काढले

तरी आपण पुन्हा एकदा लढा उभारणार असून यासाठी उपोषण तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यास उतरणार आहे.यासाठी ज्याचे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणबाबत समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधवा. आपण लवकरच जिल्हाधिकारी, प्रतांधिकारी,हायवे प्राधिकरण याच्याशी भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे