सिंधुदुर्गात २७ जुलैला लोक न्यायालय

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 24, 2024 12:20 PM
views 119  views

सिंधुदुर्गनगरी : लोकन्यायालयामुळे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले पक्षकारांचे अनेक खटले  सुटण्यास मदत झाली आहे. जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय अशा अनेक ठिकाणी  अनेक खटले  प्रलंबित असतात. ते तडजोडीने  सुटावेत अशा दृष्टीने या लोकन्यायालयात प्रयत्न होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ पैसा  व त्रास वाचतो व यात सहमतीने  न्यायदान होते. याला दरवेळी प्रतिसाद मिळत असल्यामुळे यावर्षी दि. २७ जुलै २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सिंधुदुर्ग  जिल्ह्यात लोकन्यायालय होत आहेत. तर  सर्वोच्च न्यायालयातही दिनांक २९ जुलै  ते ३ ऑगस्ट २०२४ या काळात  विशेष लोक अदालत होत असून, जिल्ह्यातील लोकन्यायालयामध्ये  तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या लोकादालतीमध्ये  पक्षकारने सहभाग घ्यावा असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा  विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश  एच.बी. गायकवाड यांच्या वतीने  विधी सेवा प्राधिकरण सचिव  न्या. संपूर्णा कारंडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात या लोक न्यायालयाची प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून  न्या. संपूर्णा कारंडे यांनी पत्रकार परिषद घेत  याबाबतची विस्तृत माहिती दिली.  व या लोकन्यायालयाचे महत्त्व ही विशद केले. न्यायलासमोर २५  ते ३० प्रकारचे खटले असतात व त्यातील बहुतांशी खटले प्रलंबित राहतात. यातील जे पक्षकार  तडजोडीसाठी  होकार देतात ते खटले लोक न्यायालयात तड जोडीसाठी ठेवले जातात  व या लोक अदालत मध्ये सुनावणी घेऊन तडजोडीने  सोडविले जातात. न्यायालयाकडून प्रलंबित असलेल्या एकूण खटल्या मधून  जवळपास दहा टक्के खटले  या लोकअदालत मध्ये ठेवण्यात येतात. व ते मार्गी लावण्याचा प्रयत्न होतो असेही  न्यायमूर्ती कारंडे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील लोकन्यायालयामध्ये  यापूर्वी चांगला प्रतिसाद मिळाला असून या वेलच्याही लोकन्यायालयात  पक्षकारांनी सहभागी व्हावे  व आपले प्रलंबित राहिलेले खटले सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहान न्या. संपूर्णा कारंडे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयात  प्रलंबित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन खटले  सर्वोच्च न्यायालया कडील या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आल्याची ही माहितीही त्यांनी यावेळी दिली.