
कुडाळ : पावशी सरपंचांनी गेल्या पाच वर्षात काहीच केले नाही.विकासाच्या नावाने त्यांनी गावातील कामांची अक्षरश: बोंब घातली आहे.त्यामुळे शिवसेनेचे पावशी सरपंच यांनी उभे केलेले पॅनलचा एकतर्फी धुव्वा उडेल.आणी पावशी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा प्रणित पावशी गाव समृद्ध विकास पॅनलचे सरपंच पदाच्या उमेदवार अर्पिता आनंद शेलटे यांच्यासह सर्वच्या सर्व अकराही सदस्य विजयी होतील.असा दावा भाजपचे माजी पावशी सरपंच पप्या तवटे यांनी केला आहे.