लोकांचा आमच्यावर विश्वास ; निकालात विजय आमचाच : निलेश राणे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 03, 2023 18:44 PM
views 215  views

मालवण : भाजपा - शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे आचरे गावात आम्ही विकास हाच अजेंडा ठेवत आम्ही लोकांसमोर गेलो आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहेत. त्यामुळे निकालात विजय आमचाच होणार असून गुलाल भाजप - शिवसेना युतीचाच उडेल असा विश्वास भाजपा कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निळेश राणे यांनी व्यक्त केला. 

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचे जेरोन फर्नांडीस यांनी घरोघर प्रचारावर भर देत आपला झंझावाती प्रचार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आचरे गावात भेट देतली. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांशी चर्चा केली. निवडणुक प्रचाराचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस, महेश मांजरेकर, महेंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी संतोष कोदे, निवडणूक प्रमुख संतोष गावकर, राजन पांगे, बाबू परुळेकर, दीपक सुर्वे, मंदार सरजोशी, बाबू कदम, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, पूजा सरकारे, महिमा मयेकर, प्रमोद करलकर, सचिन हडकर, दत्ता वराडकर, यासह सदस्य पदाचे उमेदवार सारिका नंदकिशोर तांडेल, प्रियता पांडुरंग वायंगणकर, मुजफ्फर बशीर मुजावर, प्राजक्ता नामदेव देसाई, सायली सचिन सारंग, योगेश गोविंद गांवकर, श्रुती श्रीपाद सावंत, चंद्रकांत धोंडू कदम, हर्षदा उदय पुजारे, महेंद्र गोविंद घाडी, पंकज वामन आचरेकर, किशोरी किशोर आचरेकर, संतोष गणपत मिराशी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले, शिवसेना भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. हे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. पुढील पाच वर्षात काय करणार याचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहोत. त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. सरपंच पदाचे उमेदवार  जेरॉन फर्नांडीस यांचे स्वतःचे एक वेगळे वलय आहे. आम्ही कसल्याच राजकारणात पडलो नाही. प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निकालात विजय आमचाच होणार असून गुलाल भाजप - शिवसेना युतीचाच उडणार असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.