पेहेलगाम हल्ला

सावंतवाडीत आज निषेध सभा
Edited by:
Published on: April 25, 2025 12:44 PM
views 211  views

सावंतवाडी : काश्मीर मधील पेहेलगाममध्ये पाकीस्तान पुरस्कृत लष्कर ए तोयबाच्या संबंधीत आतंकवाद्यांनी धर्माची विचारणा करुन २६ निरपराध हिंदूंची गोळ्या घालून निघृण हत्या करण्यात आली. उद्दामपणे महिलांशी वागणूक केली. मोंदींवर शरसंधान केल. हे का, तर केवळ हिंदू असल्याबद्दल. निष्पाप लोकांचा जीव घेताना कपडे उतरवून मुस्लिमपणाची खात्री करुन घेतली. याचा निषेध नोंदवून पाकिस्तानचा ध्वज जाळून शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज संध्याकाळी ठिक ६ वाजता विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सायंकाळी सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आपणावर पण ही वेळ येऊ द्यायची नसेल तर उठा, जागे व्हा, एकत्वासाठी सज्ज होऊया. या हत्येचा आणि पर्यायाने पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यासाठी व शहीद हिंदू बांधवाना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्व देशभक्त हिंदू बांधव, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे विश्व हिंदू परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर यांनी केले आहे.