
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची सर्वसाधारण सभा आज कै. सहदेव उर्फ काका मांजरेकर सभागृहात पार पडली. या सभेत मळगाव गावचे सरपंच हनुमंत पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला देविदास आडारकर, दिलीप पेडणेकर, गुरुदास पेडणेकर, राजेंद्र बिर्जे, चंद्रकांत वाडकर, ज्ञानदीप राऊळ, लव कुडव, दीपक जोशी, नामदेव साटेलकर, सिद्धार्थ पराडकर, संजय पिळणकर, सुरेश राऊळ, देवता पेडणेकर आदी उपस्थित होते.