वैज्ञानिक प्रगतीसाठी बालवैज्ञानिक प्रदर्शन महत्त्वाचं ठरेल : जिल्हाधिकारी किशोर तावडे

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 07:46 AM
views 94  views

सावंतवाडी : ५१ व राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यांसह माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ५१ व राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन होत असून याचा मान आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.

विद्यार्थ्यांनी कौशल्यपुर्ण प्रतिकृती या ठिकाणी तयार केल्या आहेत. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी, वैज्ञानिक प्रगतीसाठी हे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन महत्त्वाच ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी व्यक्त केला.