सामान्यांच्या प्रश्नाबाबत पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 02, 2024 12:14 PM
views 99  views

सावंतवाडी : राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादीचे शरद पवार गट तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले.  राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला, सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका, असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधल.

कापूस, सोयाबीन, कोदा, तूर या शेतमालाला भाव नाही. अतिवृष्टिमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचं नुकसान होऊ नही विम्याची नुकसानभरपाई मिळत नाही. नोकरभरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारुनही होत असलेली पेपरफुटी ही तर नहेमीचीबाब झाली आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारंवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत जात आहे.

आदी विविध समस्यांबाबत त्यांनी लक्ष वेधले. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष विवेक गवस, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल तालुका उपाध्यक्ष याकूब शेख, तालुका चिटणीस प्रकाश माडगूत, शहर सदस्य राकेश नेवगी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान पदाधिकारी इलियास आगा तौसीफ आगा चंद्रशेखर परब, अमोल दळवी आदी उपस्थित होते.