
देवगड : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आर्ट सर्कल-देवगड आणि स्वरऋतू यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तिपर गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या कार्यक्रमात विविध कलावंत देशप्रेम जागवणारी गीते सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात प्रसाद शेवडे, विनायक ठाकूर, राधा जोशी, सावनी शेवडे, निशा धुरी, विश्वजीत उर्फ छोटू सातवळेकर आदी गायक सहभागी होणार आहेत. तर वाद्यवृंदामध्ये सचिन जाधव, प्रसाद जाखी, हर्षद जोशी, सौरभ वेलणकर, अभिनव जोशी, विकास नर, आदर्श सावंत हे कलावंत साथसंगत करतील. निवेदन संजय कात्रे करणार आहेत.
कार्यक्रम गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता "गुरुदक्षिणा प्रेक्षागृह", शेठ म.ग. हायस्कूल , देवगड येथे होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. आयोजकांनी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.