देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला १६ पासून !

दिग्गज मान्यवरांची व्याख्याने
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 10, 2023 21:57 PM
views 177  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यावतीने देशभक्त  प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला १६ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत सायंकाळी ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार १६ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोल्हापूर येथील कोरगावकर ट्रस्टचे विश्वस्त आशिष कोरगावकर उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेत १६ जानेवारीला बेळगाव येथील प्राध्यापक आनंद मेणसे  यांचे जागतिक फैसिझमचे संकट या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत हे आहेत. १७ जानेवारीला शाश्वत पर्यटन या विषयावर निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत आहेत. १८ जानेवारीला माध्यमांनी भारतीय लोकशाहीसमोर उभे केलेले आव्हान या विषयावर मुंबई येथील ज्येष्ठ  पत्रकार अमेय तिरोडकर यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी आहेत. १९ जानेवारीला अभिव्यक्ती के खतरे या विषयावर कोल्हापूर येथील ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. अनिल फराकटे आहेत. २० जानेवारीला नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल हे आहेत. समारोपप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्याख्याने रोज सायंकाळी सहा वाजता सुरू होतील. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर,  कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे यांनी केले आहे.