
कणकवली : नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठपर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मुसळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. प्रभागाला सर्व सुविधांनी परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे या प्रभागातील जनतेच्या वतीने नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी भरत उबाळे, विजय म्हापसेकर, महेश सामंत, राजू मुसळे, अमित कडुलकर, पंकज पेडणेकर, ओंकार सुतार, मयूर धुमाळे, राजा पाटकर, नवू झेमणे, गौरव नेमळेकर, बाळू उबाळे, अमित धुमाळे, सागर होडावडेकर, तुषार मोरये आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.