
सावंतवाडी : तुतारी एक्स्प्रेसमधील अस्वच्छतेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व स्वच्छता न राखली गेल्यानं कोकणातील प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कोकणातील प्रवासी अधिक प्रमाणात तुतारी एक्स्प्रेसनं प्रवास करतात. मात्र, या एक्सेसमध्ये अस्वच्छतेच साम्राज्य बघायला मिळत आहे. प्रसाधनगृहासह प्रवासी डब्यात कचरा दिसून येत आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सफाई कामगारांची कपात केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे कारण समोर येत आहे. कोकणातील शिमगोत्सव व आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा तोंडावर आली आहे. कोकणवासिय या निमित्ताने गावी येणार आहेत. त्यामुळे या आधीच रेल्वे प्रशासनानं दखल घेऊन स्वच्छता राखावी अशी मागणी देखील प्रवासी वर्गातून होत आहे.