
सावंतवाडी : निवृत्त पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली यांचे गुरुवारी सकाळी ओरोस येथील निवासस्थानी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. नुकतेच ते सावंतवाडी पोलीस ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. गेले काही दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना असा मोठा परिवार आहे.