परुळेबाजार ग्रामपंचायतीने खरेदी केली इलेक्ट्रिक घंटागाडी

गव्हर्नमेंट-ई-मार्केटप्लेस पोर्टलवर खरेदी करणारी पहिली ग्रामपंचायत
Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 18:40 PM
views 182  views

वेंगुर्ले : केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट-ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टलवर खरेदी करणारी जिल्ह्य़ातील परूळेबाजार ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. गावासाठी इलेक्ट्रिक घंटागाडी खरेदी केली असल्याची माहिती सरपंच प्रणिती आंबडपालकर आणि ग्रामसेवक शरद शिंदे यांनी दिली.

     परूळेबाजार ग्रामपंचायत नेहमी विविध अभियानात अग्रेसर अशी ग्रामपंचायत आहे. संत गाडगेबाबा सह विविध अभियानात राज्यात चमकलेल्या परुळे बाजार ग्रामपंचायतीने इलेक्ट्रिक घंटागाडी खरेदी केली असून जिल्ह्यात ई मार्केटप्लेस वर खरेदी करणारी परुळे बाजार ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सह विविधक्षेत्रात राज्यात नावलौकिक मिळवलेले ग्रामपंचायत असून केंद्र सरकारने विकसित केलेल्या गव्हर्मेंट मार्केप्लेस(Gem) पोर्टलवर परुळे बाजार ग्रामपंचायत ट्राय सायकल इलेक्ट्रिक घंटागाडी, बॅटरी ऑपरेट ट्राय सायकल खरेदी केली आहे. त्यामुळे गावातील कचरा गोळा करण्यास मदत होणार आहे. ओला सुका कचरा वर्गीकरण होण्यासही मदत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छता अभियान उपक्रमात परुळे बाजार ही राज्यस्तरावर पोहोचलेली ग्रामपंचायत असून या अभियानाचा एक भाग म्हणून या ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिती आंबडपालकर ,ग्रामसेवक शरद शिंदे ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या बहुमोल प्रयत्नाने या ग्रामपंचायतीने हे पहिले महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल तनपुरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मिशन श्री विनायक ठाकूर, मा गटविकास अधिकारी, श्रीम राणे मॅडम, विस्तार अधिकारी ग्राप धुरी, जिल्हा व तालुका पाणी व स्वच्छता विभागाचे श्री मठकर, पाटील, पिंगुळकर ,कामतेकर ,नाईक मॅडम यांनी बहुमूल्य सहकार्य केले असल्याचे सरपंच प्रणिती आंबडपालकर व ग्रामसेवक श्री शरद शिंदे यांनी सांगितले, परुळे हे पर्यटन दृष्ट्या विकसित असे गाव असून पर्यटनाचा एक भाग त्याचबरोबर स्वच्छतेत अग्रेसर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या गावातील विकासाबाबत सदरची ग्रामपंचायत सर्वांच्या एकजुटीने मेहनतीने विविध उपक्रम राबवीत आहे शासनाच्या या विविध उपक्रमात जनतेने सहकार्य करावे असे आवाहन ही सरपंच प्रणिती आंबडपालकर यांनी केले आहे.