
सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत.
यावेळी निरीक्षक शेखर माने म्हणाले, हि फुट का पडली कळलं नाही. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून सांगतो आपला पक्ष आधीपेक्षा इथं बळकट झाला आहे. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली चांगल काम करत आहे. अजित पवार व ९ जणांच्या मागे लागलेल्या चौकशांमुळे शरद पवारांचा विश्वासघात केला. भाजपला जाऊन मिळले असं मत व्यक्त केले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे, शेखर माने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.