वैभववाडीतील तलाठी आंदोलनात सहभागी !

११ गावातील तलाठी कार्यालय बंद
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 17, 2023 13:58 PM
views 111  views

वैभववाडी : तलाठ्यांना अतिरिक्त सज्यांचे दिले जाणारे काम थांबण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात वैभववाडी तालुक्यातील तलाठी सहभागी झाले आहेत.तालुक्यातील ११अतिरिक्त सजांचे काम बंद करण्यात आले आहे. या सजांमधील केवळ निवडणूक व नैसर्गिक आपत्तीच काम केले जाणार असल्याचे तलाठी संघटना तालुका अध्यक्ष सोनू सावंत यांनी सांगितले.

त्यामुळे तालुक्यातील  एडगाव, कुर्ली , गडमठ, लोरे नं २, आचिर्णे, सोनाळी, मांगवली, करुन, हेत, कोळपे, नानीवडे या गावातील तलाठी कार्यालये बंद आहेत. या गावांचा अतिरिक्त असलेला कार्यभार सांभाळण्यास नकार दिला आहे. या सजांच्या चाव्या तहसीलदार यांच्याकडे जमा केल्या आहेत.