कणकवली रेल्वे स्टेशनच्या सिलिंगचा भाग कोसळला

कामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची ठाकरे सेनेची मागणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 07, 2025 18:57 PM
views 2558  views

कणकवली :  रेल्वे स्टेशन परिसराचे गतवर्षी सुशोभिकरण करण्यात आले होते. शनिवारी दुपारी स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड नजीक केलेल्या छताच्या सिलिंगचा काही कोसळला. कोसळलेली सिलिंगची प्लेटस् लोंबकळत होती. प्लेटस् लोंबकळत राहिल्याने मोठा अनर्थ टळला. हा घटनेमुळे कामाच्या दर्जाबाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

सिलिंग काही कोसळल्याची घटनेची माहिती मिळताच शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकारी घटनास्थळी जात पाहणी केली. या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी ठाकरे सेनेच्या पदाधिकाºयांनी केली. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,डॉ. प्रथमेश सावंत,सतीश परब, सतीश मर्गज, चंद्रकांत सावंत, किरण रेडकर आदी उपस्थित होते.

रेल्वे स्टेशन परिसराचे गत़वर्षी सुशोभीकरण करण्यात आले होते.  सुशोभिकरणामुळे स्थानक परिसराला विमानतळाचा लूक प्राप्त झाला आहे. गतवर्षी गवारेड्याची पुतळ्याची शेपटी तुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर सेल्फी पाईंटमधील लाईट बंद पडली होती. वर्षभरातच रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागात केलेले सिलिंगचा काही भाग कोसळल्याने या कामाच्या दजार्बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.