कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधातील उपरकरांचे आंदोलन स्थगित !

अधीक्षक अभियंत्यांनी दिले लेखी पत्र
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 15, 2024 13:50 PM
views 77  views

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मालवण येथील नवसा नौसेना दिनानिमित्त केलेल्या कामांच्या खर्चाची तसेच कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाच्या खर्चाची सखोल चौकशी  करावी या मागणीसाठी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर  माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. मनाई आदेश लागू असल्याने पोलिसांनी आंदोलन थांबवण्याची  विनंती केली. तसेच अधीक्षक अभियंत्यांनी   श्री.उपरकर यांना लेखी पत्र दिले. त्यात आपल्याशी चर्चा करुन श्री.सर्वगोड यांच्या विरोधात असलेल्या तक्रारी बद्दल वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधातील ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले .

मालवणात नौसेना दिनानिमित्त अनेक विकास कामे झालीत,त्या कामांची आणि कणकवली रेल्वे स्थानक रस्ते सुशोभीकरण कामांसंदर्भात कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची चौकशी व्हावी, यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद सांडव, प्रसाद गावड़े, दीपक गावडे, बाबल गावडे, राजेश टंकसाळी, आप्पा मांजरेकर अशिष सुभेदार, मंदार नाईक, संदीप लाड,अमित इब्रामपूरकर व विल्सन गिरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.