परशुराम उपरकर पुन्हा स्वगृही परतणार !

ठाकरे शिवसेनेत जाण्याची शक्यता !
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 01, 2024 07:08 AM
views 1042  views

कणकवली : आमदार परशुराम उपरकर पुन्हा स्वगृही ठाकरे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. मनसेतून फारकत घेतलेले माजी आमदार परशुराम उपरकर व त्यांचे कार्यकर्ते पुन्हा स्वगृही म्हणजे ठाकरे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुन्हा एकदा शिवसेने सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

याबाबतचा निर्णय श्री. उपरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. श्री. उपरकर यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेचा रस्ता धरला होता, त्यांनी मनसेत काम केले परंतु अंतर्गत असलेल्या हेवेदाव्यामुळे त्यांची काही महिन्यांपूर्वी मनसे पक्षचा राजीनामा दिला होता. त्यानंतर श्री. उपरकर गेले काही दिवस अलिप्त होते. मध्यंतरी झालेल्या पत्रकार परिषद आपण सत्तेत असलेल्या पक्षात जाणार असे त्यांनी वक्तव्य केले होते, परंतु त्यानंतर ते काही शांत होते.

दरम्यान, आता ते पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित ३ तारखेला कणकवलीत होणाऱ्या सभेत ते ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. उपरकर हे कडवट शिवसैनिक म्हणून परिचित आहेत.