LIVE UPDATES

पारपोली हे फुलपाखरांचे गाव म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली पाहिजे

फुलपाखरू महोत्सव सिम्बॉलचा शुभारंभ
Edited by: विनायक गावस
Published on: October 16, 2023 14:18 PM
views 188  views

सावंतवाडी : पारपोली हे फुलपाखरांचे गाव म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली पाहिजे असा फुलपाखरू महोत्सव झाला पाहिजे असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केल. फुलपाखरू महोत्सव सिम्बॉलचा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आणि अभिनेता दिगंबर नाईक यांच्या हस्ते उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

मंत्री दीपक केसरकर यांनी फुलपाखरू महोत्सव आढावा घेतला. या महोत्सवात जंगल सफारी, फुलपाखरू ओळख, निसर्ग सौंदर्य ओळख करून महोत्सवाचे महत्त्व जगभरात नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, या ठिकाणी असलेल्या फुलपाखरूच्या प्रजाती सर्वांना कळल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मत व्यक्त केले.

यावेळी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, अभिनेता दिगंबर नाईक,पारपोली सरपंच कृष्णा नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, संदेश गुरव, गौरेश तेजम, सौ.ऋतुजा परब, प्रियांका गुरव, प्रमोद परब, गजानन नाटेकर, एकनाथ परब, दादा देसाई, आदी उपस्थित होते.