शाळा टिकविण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे : प्रकाश पावसकर

Edited by:
Published on: June 24, 2024 13:19 PM
views 184  views

सिंधुदुर्गनगरी : कमीटक्केवारी नंतर आता शंभर टक्के प्राविण्य मिळविणाऱ्या सरस्वती हायस्कूल चा शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या प्रयत्नाला पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांनी सहकार्य करावे जेणेकरून शाळेची विद्यार्थी संख्या व शाळा टिकेलअसे आवाहन शैक्षणिक संस्था सुकळवाड गावराईचेअध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी केले.

गावराई साई मंदिर येथेसरस्वती विद्यामंदिर येथील आठवी ते दहावी पर्यंतच्याविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष प्रकाश पावसकर, सुकळवाडब्राह्मण देव सेवा समिती अध्यक्ष अनिल पालकर, यशवंत एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विलास मसुरकर,भाऊ पाताडे, बाबुराव मसुरकर,सागर कुशे  ,सचिव संतोष पाताडे,उपाध्यक्ष महेश परुळेकर, हरी वायंगणकर, आला वालावलकर,सुनील पालकर, गुरु परुळेकर, रमेश वेंगुर्लेकर , लतिका पाताडे  ,रुचीता नांदोसकर आदींसह शाळेचे विद्यार्थी दहावी मध्ये प्रथम  ,द्वितीय , तृतीयप्राविण्य प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सरस्वती विद्यामंदिर हायस्कूल मधील आठवी ते दहावी मधील २५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाताडे यांनी केले.

यावेळी अध्यक्ष प्रकाश पावस्कर म्हणाले सुकळवाड शैक्षणिक संस्थेची स्थापना येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी आणि सरस्वती विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे येथे येणारा विद्यार्थी यशस्वी व्हावा. याच उद्देशाने ही संस्था स्थापन केली असून गेल्या दोन वर्षात सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलचा दहावी मध्ये शंभर टक्के  निकाल लागत आहे. हे आमच्या शैक्षणिक संस्थेचे यश आहे. आमचा उद्देश सफल होत असून राजकारण विरहित असे या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे. यासाठी सुकळवाड, गावराईपंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांनी आपली संस्था टिकावी आणि  विद्यार्थ्यी दर्जेदार शिक्षण घेऊन यशस्वी व्हावेत .यासाठी यापुढे तरी या हायस्कूलमध्ये आपले पाल्य घालावे अन्य शाळेमध्ये घालून चांगले शिक्षण हा पालकांमध्ये झालेला एक प्रकारचा भ्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी उपस्थितांचे आभार महेश परुळेकर यांनी मानले.