हकालपट्टी की राजीनामा ?

Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 08:52 AM
views 1198  views

सावंतवाडी : पक्षाच्या सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनामा देत असल्याच पत्र मनसे नेते, माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिलं आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सरचिटणीस या पदाचा राजीनामा देत आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा ही राजीनामा देत आहे. आपणास विनंती आहे माझा हा राजीनामा आपण स्वीकारावा अशी मागणी जीजी उपरकर यांनी केली आहे. 


उपरकरांचा राजीनामा 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही. संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी असं पत्र मनसे नेते शिरीष सावंत यांनी काढल आहे. मनसे अधिकृत वरून ते पत्र व्हायरल करण्यात आलं आहे.

मनसेचं पत्र