
सावंतवाडी : रेल्वे स्टेशन सुशोभिकरण केल्याची वा-वा कार्यकारी अभियंता, सर्व अधिकारी, पालकमंत्री दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जनता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पावसात भिजत गाड्या पकडतात, हे दुदैवी आहे. रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन परिस्थिती बघाणार का ? असा सवाल माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी केला आहे.
दरम्यान, प्रवासी रेल्वेत चढताना उतरताना प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्या प्लॅटफॉर्मवर ख-याअर्थाने सुशोभिकरण करण्याची गरज होती अशी टीका माजी आ. उपरकर यांनी केली. तर मंत्री दीपक केसरकर यांनी केलेली अॅम्युझमेंट पार्कची घोषणा ते कधी पूर्ण करणार असा सवाल करत एसटी स्टँड समोर पडलेले खड्डे हे केसरकारांना दिसत नाही का ? असा सवाल त्यांनी या उपस्थित करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केसरकर फक्त विकासाच्या घोषणा करतात. मात्र केलेल्या घोषणांचे काय झालं असा सवाल श्री उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी उपरकर समर्थक आशिष सुभेदार उपस्थित होते.