
दोडामार्ग : हिंदू नववर्ष गुढी पाडव्या निमित्त जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानिजधाम रत्नागिरी यांच्या माध्यमातून जिल्हा सेवा समिती सिंधुदुर्गच्यावतीने रविवार 30 मार्च रोजी दोडामार्ग येथे शोभा यात्रा आयोजित करण्यात अलि आहे.
यानिमित्त जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सांस्कृतिक पथके, रथ देखावे, विविध कलाकृती भारतीय संस्कृती, सभ्यता, विचार विविध परंपराचे दर्शन या शोभा यात्रेतून केले जाणार आहे. तरी या शोभा यात्रेचा अर्वानी आनंद घ्यावा असे सांगण्यात आले आहे.