परब मराठा समाज सिंधुदुर्गची २७ एप्रिलला बैठक

Edited by:
Published on: April 25, 2025 15:55 PM
views 177  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील परब बांधवासाठी व्यवसाय, शिक्षण आणि स्पर्धात्मक युगात उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी होणार सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त परब बांधवानी एकत्र यावे असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

परब मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी वर्ग यांचे व्यवसाय, शिक्षण आणि स्पर्धात्मक युगात उज्ज्वल भविष्य घडावे या उदात्त हेतूने रविवार २७ एप्रिल रोजी संध्याकाळी 3.30 वाजता ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात येथे परब मराठा समाज सिंधुदुर्गची तातडीची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत परब मराठा समाज सिंधुदुर्ग सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्गातील परब मराठा समाज बांधवांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे..