
देवगड : बारावी परीक्षेत श्रीमती. एन्. एस्. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयीन विद्याथ्यांनी सुयश मिळवले असून या फेब्रुवारी, २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल आज दि २१/०५/२०२४ रोजी जाहीर झाला असून महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७.१३ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे यश संपादन केले आहे. शाखानिहाय निकाल व गुणानुक्रमे प्रथम आलेले तीन क्र मांक पुढीलप्रमाणे
बारावी विज्ञान शाखेमध्ये १९५ पैकी १९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या १०० टक्के निकाल या शाखेचा लागला आहे .या मद्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक वेदांती जितेंद्र पिसे
हिचा आला असून ४९४/६०० गुण ८२.३३ टक्के मिळवले आहेत तर द्वितीय क्रमांक मनस्वी रमाकांत नाईक ४८२/६०० गुण ८०.३३ टक्के मिळवले आहेत तर तृतीय क्रमांक
पद्मजा प्रसाद घाडी ४७८/६०० गुण ७९.६६ टक्के मिळाले आहेत तसेच बारावी कला शाखेचा १७७ पैकी१६० उत्तीर्ण झाले असून ९०.३९ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक हर्ष दिपक जाधव ४७१/६००गुण ७८.५० टक्के तसेच द्वितीय क्रमांक सुचिता लक्ष्मण मांजरेकर ४४१/६०० गुण ७३.५० टक्के तर तृतीय क्रमांक सानिका सतिश गोईम ४२०/६०० गुण ७०.०० टक्के तसेच बारावी वाणिज्य शखेमध्ये २१३ पैकी २१२ उत्तीर्ण होऊन ९९.५३ टक्के निकाल लागला आहे त्यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक मनस्वी विनायक बांदिवडेकर५५५/६०० गुण ९२.५० टक्के तर द्वितीय क्रमांक सोहम जितेंद्र मोंडकर ५२९/६०० गुण ८८.१७ टक्के तर तृतीय क्रमांक भूमिका प्रशांत तारी ४९६/६०० गुण ८२.६७ टक्के तसचे बारावी एम्सीव्हीसी ४२ पैकी ४२ उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे.यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक कस्तुरी संजय घाडी ५०२/६०० गुण ८३.६७ टक्के तर द्वितीय क्रमांक सानिया अनिल कुळकर ४९३/६०० गुण ८२.१७ टक्के तर तृतीय क्रमांक अपूर्वा अजय शिर्सेकर ४७५/६०० गुण ७९.१७ टक्के कु. बांदिवडेकर मनस्वी विनायक (वाणिज्य शाखा) ६०० पैकी ५५५ गुण (९२.५० टक्के) मिळवून चारही शाखात व महाविद्यालयात सर्वप्रथम.येण्याचा बहुमान मिळवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे यावेळी संस्थाचालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले आहे .