थाळी फेकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत पांडुरंग पाटकर दमदार कामगिरी..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 01, 2023 16:28 PM
views 111  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद चंद्रपूर, बल्लापूर तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी पांडुरंग संताजी पाटकर यांने थाळी फेक या क्रीडा प्रकारात ३५. ५० मीटर थाळी फेकून राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले.

शाळेच्या इतिहासात प्रथमच एका देदिप्यमान यशाला गवसणी घालून केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी पांडुरंग संताजी पाटकर याचे व मार्गदर्शक शिक्षक आर. के. राठोड यांचे अभिनंदन केले.