पणदूर - कडावल मंडल आयोजित विशाल हिंदू संमेलन

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 14, 2026 14:25 PM
views 27  views

कुडाळ : मंगळवार दिनांक १२ मे २०२६ रोजी  हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला पणदूर व कडावल मंडळातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुरुवातीला शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर गायनाने कार्यक्रमामध्ये चैतन्य निर्माण केले . त्यांनी गायलेल्या "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" या गाण्याने सर्वांची छाती अभिमानाने भरून आली. यानंतर प्राथमिक शाळा  डिगसच्या  विद्यार्थिनींनी समय नृत्य सादर केले. "स्वर्गा पेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण" या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. 

यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतरकार्यक्रमाचे संयोजक श्रीकृष्ण शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर सनातन संस्थेच्या अंजली  मणेरिकर यांनी आपले बहुमूल्य विचार मांडले.विशेषतः लव जिहाद सारख्या विषयावर जोर देत त्यांनी आपली संस्कृती टिकवण्याबाबत आवाहन केले. यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख मंगेश पाटील यांनी आपले जाज्वल्य विचार मांडले. शिवशंभूनी हिंदू धर्मासाठी केलेला त्याग  आपल्या नेहमी स्मरणात ठेवला पाहिजे असे त्यांनीआवाहन केले. त्यांचे विचार ऐकून सर्वांचेच रक्त सळसळून उठले. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकर्ते प्रसादजी आगवेकर यांनी  हिंदू संस्कृतीला पोषक असे विचार मांडले व पंच परिवर्तन अंगी बनविण्याचे आवाहन केले कार्यक्रमास लाभलेल्या तिन्ही वक्त्यांनी श्रोत्यांना जागीच खिळवून ठेवले.  शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत उगवेकर यांनी केले तर आभार नरेश परब सर यांनी मानले.