पंढरीनाथ तेंडोलकर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 10, 2023 19:00 PM
views 312  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ शिक्षकांना  शरद कृषी भवन येथे शिक्षक पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आलं.


कुडाळ तालुक्यातील अनाव दाभाची वाडी येथे पदवीधर शिक्षक तसेच अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकर्ते माजी कुडाळ तालुका सरचिटणीस शिक्षक पंढरीनाथ तेंडोलकर यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते त्यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं.


अखिल प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा प्रवक्ता के. टी.चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, तालुकाध्यक्ष यल्लाप्पा दळवी, सचिव विजय धामापूरकर, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत वारंग, सहदेव घाडी, सयाजी मोर्ये, प्रकाश तेंडोलकर, भालचंद्र आजगावकर आदिनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.