
मंडणगड : मंडणगड येथील कनिष्ठ न्यायालयाचे नुतन इमारतीचे उद्घाटन सोहळ्याचे पार्श्वभुमीवर अखिल भारतीय अधिवक्ता परिषेदेचे मार्गदर्शक व महाराष्ट्र गोवा बार कौन्सीलचे माजी अध्यक्ष अँड. पारिजात पांडे यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी मंडणगड तालुक्याचा दौरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगड यांचेवतीने माजी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोरे, यश मेहता, गिरीष जोशी, मकरंद रेगे व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मंडणगड तालुका बार असोसिएशनचेतीने अध्यक्ष अँड. मिलींद लोखंडे, अँड. सचिन बेर्डे, अँड. आदित्य सुळे, अँड.सुमेश घागरुम अँड. धनंजय करमरकर व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले .याचबरोबर मुंडे महाविद्यालयाचेवतीने प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दौऱ्याचे निमीत्ताने श्री. पांडे यांनी कनिष्ठ न्यायालय भिंगळोली येथे मंडणगड तालुका बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यासमेवत चर्चा केली. न्यायालयाचे इमारतीचे कामकाज व उद्घाटन सोहळ्याची तयारी यांचा आढावा घेतला. न्यायालयाची नवीन इमारतीचे परिसरास भेट देऊन तेथील बांधकामाचे प्रगतीचा आढावा घेतला. शहरातील लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंब़डवे या मुळ गावास भेट दिली. या दौऱ्यात त्यांचे समवेत रायगड जिल्ह्यातील सरकारी वकील व रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अँड. संतोष पवार, रत्नागिरीचे सरकारी वकली अँड. अनिरुध्द फणसेकर, रत्नागिरी जिल्हा अधिवक्ता परिषदचे महामंत्री चिपळूण येथील अँड. मिलींद तांबे, खेड येथील अँड.सिध्देश बुटला, मंडणगड नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.