पंचायत समिती देवगडची मोटारसायकल रॅली ठरली लक्षवेधी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 14, 2024 12:22 PM
views 504  views

देवगड : हर घर तिरंगा उपक्रमांअंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजित तिरंगा मोटारसायकल रॅली देवगड ते विजयदुर्ग किल्ला  रॅली गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी स्मरणात रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनांच्या ७८ व्या दिन अंतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पंचायत समिती देवगड मध्ये विविध उपक्रम राबविले गेले त्याच अनुषंगाने १४ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहन सहाय्यक गटविकास अधिकारी  मुकेश सजगाने यांच्या हस्ते झाले . त्यानंतर  देवगड ते विजयदुर्ग  रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीचे खास वैशिष्टये म्हणजे पंचायत समिती देवगड ते विजयदुर्ग किल्ला तिरंगा मोटारसायकल रॅलीचा प्रवास करत भारत माता कि जय , वंदे मातरम , हर घर तिरंगा , जय जवान जय किसान या घोषणा देत २८ किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पुर्ण करत विजयदुर्ग किल्लामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली .

गटविकास अधिकारी देवगड  वृक्षाली यादव व सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या रॅलीत पंचायत समिती देवगड अधिकारी , कर्मचारी , ग्रामसेवक तसेच गिर्ये , रामेश्वर , विजयदुर्ग ग्रामपंचायती सहभागी झाले होते . या रॅलीचे स्वागत गिर्ये ग्रामपंचायत व विजयदुर्ग ग्रामपंचायतीने केले .