
देवगड : पंचायत समिती देवगड आयोजित महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी देवगड श्रीम .वृक्षाली यादव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाले .
यावेळी गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव म्हणाल्या की महिलांनी केवळ आर्थिकदृष्टया सक्षम न राहता सामाजिक दृष्ट्याही सक्षम असणे गरजेच आहे . तसेच मिळालेले काम किंवा पदाला आपल्या मेहनतीने न्याय देणे गरजेचे आहे . महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असुन शासनाच्या माध्यमातुन महीलांना बऱ्याच सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या सर्व सुविधा तळागाळातील महिलांपर्यत पोहचवण्याचे काम आपण सर्वानी केल पाहिजे असे आवाहन वृक्षाली यादव यांनी केले .
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे म्हणाले की महिला दिन साजरा करत असताना प्रत्येक महिलेने खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे रहावे . महिलांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे .
या कार्यक्रमात प्रतिमा वळंजु , पशुधन अधिकारी विवेक ढेकणे , शिक्षिका संजिवनी फडके यांनी मार्गदर्शन करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , पशुधन अधिकारी विवेक ढेकणे , वरीष्ट सहाय्यक स्वप्नजा बिर्जे , अधिक्षक मेधा राणे , आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम . प्रतिमा वळंजु , कनिष्ठ सहाय्यक विलास लोके , मुख्यसेविका पुजा सावंत , मुख्यसेविका सुवर्णा भगत , शिक्षिका कोमल राऊत , ग्रामसेविका संगिता राणे , संजिवनी फडके ,रंगा पाटणकर, दिग्विजय कोळंबकर ,दिपीका पालकर, भारती आसरोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पाककला स्पर्धा व फनी गेम्स स्पधेच आयोजन करण्यात आल होत . पाककला स्पधेत परीक्षक म्हणून स्वामी समर्थ हॉलचे मालक रंगा पाटणकर , वसंत विजय चे मालक दिग्वीजय कोळंबकर यांनी परीक्षण केले या स्पधेत २३ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होतो यामध्ये प्रथम क्रमांक शितल श्रीकृष्ण गिरकर नाचणीचे गुलाबजाम , द्वितीय क्रमांक वृक्षाली नाईकधुरे (बापर्डे ) तर तृतीय क्रमांक वैष्णवी बांदकर ( मोंड )हिने पटकावला . तर फनी गेम्स स्पधेत ऋत्विक धुरीच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये प्रथम क्रमांक सोनाली जाधव, द्वितीय क्रमांक पुजा सावंत तर तृतीय क्रमांक स्वप्नजा बिर्जे यांनी पटकावला त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्तावणा स्वप्नजा बिर्जे, सुत्रसंचालन दिपीका पालकर , तर आभार प्रतिमा वळंजु यांनी मानले .