पं. स. देवगडला व्दितीय क्रमांक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 04, 2025 22:31 PM
views 258  views

देवगड : पंचायत समिती देवगडला अमृत महाआवास अभियान सन २०२२-२३ अंतर्गत राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून व्दितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल बालेवाडी येथे केंद्रीय मंत्री , ग्रामीण विकास कृषी एंव किसान कल्याण मंत्रालय शिवराज चौहान  व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव व तत्कालिन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .

केंद्र शासनाच्या अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल महाराष्ट्र राज्यामध्ये देवगड तालुक्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशामुळे देवगड पंचायत समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  महाराष्ट्रातील विविध तालुक्यांनी या अभियानात उल्लेखनीय प्रगती केली असून यामध्ये देवगड तालुक्याने आपले काम उत्कृष्ट रित्या पार पाडीत राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबददल सर्वस्तरावरुन पंचायत समिती देवगडचे कौतुक करण्यात येत आहे.